पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या ‘ऑर्डर ऑफ जायद’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

327

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर अबुधाबीत पोहोचले. अबुधाबीत नरेंद्र मोदींना ‘यूएई’च्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ जायद’ ने गौरवण्यात आले. मोदी यांनी यूएईचे राजे प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी या पुरस्काराने मोदींचा सन्मान केला. हिंदुस्थानचे आणि यूएईचे संबंध अधिक दृढ होत आहेत. दुबईला खास शहर बनवण्यासाठी लाखो हिंदुस्थानींनी योगदान दिले आहे, असे मोदी म्हणाले. या पुरस्कारने सन्मानित करण्यात येणारे मोदी हे पहिले हिंदुस्थानी पंतप्रधान आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. मोदींच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो. विशेष म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. यूएईने एप्रिल महिन्यात या पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची घोषणा केली होती. आमचे हिंदुस्थानसोबत ऐतिहासिक, आणि व्यापक राजनैतिक णनितीक संबंध आहेत. आमचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे संबंध बळकट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असे अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीर मुद्दावर जाहीरपणे यूएईने हिंदुस्थानचे समर्थन केले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे हा हिंदुस्थानचा अंतर्गत विषय आहे अशी भूमिका यूएईने स्पष्ट केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या