आता ड्रायव्हर सेल्फी काढणार, प्रवास सुरक्षित होणार

72

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उबेर कंपनीच्या वाहनानं प्रवास करणं आता अधिक सुरक्षित होणार आहे. कंपनीनं ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल टाकत हिंदुस्थानात एक नवीन सिस्टिम आणली आहे. कंपनीच्या नवीन सिस्टिमचं नाव आहे ‘रियल टाईम आयडी’.

कंपनीला या नवीन सिस्टिममुळे आपली गाडी कंपनीचाच चालक चावलत आहे की आणखी कोणी हे कळणार आहे. या सिस्टिमद्वारे कोणत्याही प्रवासाची सुरुवात करण्याआधी चालकाला आपला सेल्फी पडताळणीसाठी कंपनीला पाठवाला लागणार आहे. पडताळणीदरम्यान एखाद्या चालकाचा ओळखण्यास सिस्टिमनं नकार दिला तर त्या चालकाचं प्रमाणपत्र काही काळीसाठी रद्द केलं जाईल.

प्रवासामध्ये अनेक वेळा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. चालकाकडून ग्राहकांची फसवणुकही करण्यात येते. त्यादृष्टीनं ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं उबेर कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. नेमकं ही सिस्टिम काम कसं करतेय पाहा या व्हिडिओत.

आपली प्रतिक्रिया द्या