केळ्ये गावासाठी शिवसेना सरसावली, आमदार उदय सामंत यांनी केली पाणीटंचाईची पहाणी

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील केळये गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गुरूवारी शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केळ्ये गावाला भेट दिली.

केळ्ये गावातील पड्यारवाडी आणि सोलकरवाडीतील ग्रामस्थ हंडाभर पाण्यासाठी धोका पत्करत विहिरीत उतरत आहेत. ही परिस्थिती पाहून गावातील खासगी विहिरींचे पाणी आमदार उदय सामंत आणि जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप यांनी ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले. केशव पड्यार गुरुजी, भिकू लोगडे, चंद्रकांत पड्यार, यासीन धर्मे यांनी आपल्या विहिरीतील पाणी इतर ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले.