‘आडवा आणि जिरवा’ला उमेदवार व मतदारही कंटाळले; उदयनराजेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

3254

भाजपची महाजनादेश यात्रा रविवारी सातारा शहरामध्ये पोहोचली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत व छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन रोड शो सुरू झाला. यावेळी शिवेंद्रराजे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उदयनराजे यांनी कॉलर उडवली. रोड शोनंतर सर्व तांडा सभास्थळी पोहोचला. यानंतर शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी रोखठोक भाषण केले. या भाषणावेळीही उदयनराजे यांनी ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आपकी भी नही सुनता’, हा डायलॉग म्हणत पुन्हा कॉलर उडवली.

उदयनराजे भोसले यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

 • काम करणाऱ्या सरकारचे मनोधैर्य वाढवणे तुमचे, आमचे काम – उदयनराजे
 • ‘कामं आडवा आणि माणसाची जिरवा’ योजनेमुळे उमेदवार आणि मतदारही कंटाळले – उदयनराजे
 • आत्मचिंतन केले असतं तर आत्मक्लेश करण्याची वेळ आली नसती – उदयनराजे
 • आपल्या पक्षाची अशी स्थिती का झाली याचे आत्मचिंतन करावं, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला टोला
 • कृष्णा खोऱ्याचे काम रखडून ठेवल्याने एका पिढीचं नुकसान झालं, 2007 साली काम पूर्ण व्हायला हवं होतं – उदयनराजे
 • 19 तारखेनंतर मुख्यमंत्री व्यस्त असणार, उदयनराजेंचे आचारसंहितेचे संकेत
 • साताऱ्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकास कामं केली नाही, उदयनराजेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा
 • युपीए सरकारमध्ये एक-दोन शहरांचा विकास झाला, पण एनडीए सरकारने सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवले – उदयनराजे
 • कामं केल्यामुळे भाजपला मतदान मिळालं – उदयनराजे
 • माझा बँड कोणी वाजवू शकत नाही – उदयनराजे
 • काँग्रेस-राष्ट्रवादीने कामं तर केली नाही, पण मला ”सहनशीलतेचा” पुरस्कार तरी द्यायला हवा होता, उदयनराजेंची बोचऱ्या शब्दात टीका
 • काँग्रेस-एनसीपीचे सरकार असताना लोकांच्या हिताची काम नेली तर आमची फाईल कचराकुंडीत जायची, उदयनराजेंचा आरोप
 • राष्ट्रवादीत माझ्यापेक्षा शिवेंद्रराजे नशीबवान – उदयनराजे
 • 15 वर्ष राष्ट्रवादीत अडचण झाली – उदयनराजे
 • उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंचा शाहीर आमदार असा उल्लेख
आपली प्रतिक्रिया द्या