मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे अभिनंदन

हिंदुस्थानने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे.

विराटच्या जन्माच्या वेळी जे घडलं तेच त्याच्या मुलीच्या जन्मवेळीही घडलं

गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व हिंदुस्थानी नागरिकांच्या लक्षात राहील असे त्यांनी म्हटले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील  हिंदुस्थानी संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्द याच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली. धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघानं या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापीत केला ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

ऐतिहासिक विजयानंतर BCCI कडून टीम इंडियासाठी मोठी घोषणा, 5 कोटी रुपयांचा बोनस जाहीर

आपली प्रतिक्रिया द्या