उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद, १२ जुलै रोजी उत्तर महाराष्ट्र दौरा

12

सामना ऑनलाईन । मुंबई

शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना खरोखरच मिळतोय का? शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो किंवा नाही? यासह विविध प्रश्नांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. १२ जुलै रोजी उद्धव ठाकरे जळगाव व धुळे जिह्याचा दौरा करणार असून तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

… असा असेल दौरा

बुधवार, १२ जुलै २०१७

वेळ – कार्यक्रम

सकाळी ११.३० वा. – जळगाव विमानतळावर आगमन

सकाळी ११.४५ वा. – पाळधी येथे शेतकऱ्यांशी संवाद

दुपारी १२.०० वा. – धरणगांव येथे सभा

दुपारी १.३० वा. – पारोळा येथे सभा (एरंडोल विधानसभा क्षेत्र)

पारी ३ वा. – धुळे येथे सभा

आपली प्रतिक्रिया द्या