शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांशी साधला संवाद

27

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर शहरातील आणि जयसिंगपूर येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या संवादातील ठळक मुद्दे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
– ‘गुजरातच्या निवडणुका आल्यानंतर केंद्राने जीएसटीचे दर कमी केले’
– ‘महाराष्ट्रातल्या व्यापारी, उद्योजकांचे प्रश्न का सुटत नाहीत?’
– ‘मी तुमच्यासाठी सरकार विरोधात रस्त्यावर उतरेन, तुम्हीही मागे हटायला नाही पाहिजे’
– ‘मुंबईत एक दोन दिवसाचे कार्यक्रम, सभा, मोर्चाचे आयोजन करतो, सर्वांनी रस्त्यावर उतरले पाहिजे’
– ‘अन्यायात जळण्यापेक्षा अन्याय करणाऱ्यांना जाळले पाहिजेट
– ‘आधी इथल्या उद्योजकांना सुविधा द्या. त्यांचे प्रश्न कायम असताना बाहेरच्या उद्योजकांना जमीन देऊ, पाणी देऊ असं सांगितल जात आहे, यातून समस्या सुटणार नाहीत’
– ‘मार्च २०१६ मध्ये मुख्यमंत्र्यांनी वीज बील अर्धे करण्याचे आदेश दिले. पण अजून काहीच झालं नाही, यांच्या आदेशाला काय किंमत राहिली आहे’
– ‘जीएसटीमध्ये मुंबईची स्वायत्तता कायम ठेवण्याची मागणी केली होती. अरुण जेटलींना सांगितले होते, त्यांनी ते मान्य करत प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला पैसे जमा होत आहेत. ताचा फायदा राज्यातील इतर महापालिकांनाही झाला आहे’
– ‘बिल्डर, केमिस्ट, स्टील उत्पादक, सुत-कापड उत्पादक, कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिक, सराफ, इतर दुकानदार यांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या.

आपली प्रतिक्रिया द्या