भूमिका बदलल्या नाहीत तरी; सरकार किमान समान कार्यक्रमावरच चालणार!

1740

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष सहभागी आहेत. अनेक वर्षांच्या राजकारणात असलेल्या आपल्या भूमिका बदलणार नसल्या तरी महाविकास आघाडीने एक किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. त्या आखलेल्या कार्यक्रमावरच हे सरकार चालणार आहे. सीएए किंवा अन्य कोणत्याही विषयांचा सरकारवर परिणाम होणार नाही. तेव्हा विरोधी पक्षाने कितीही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे डाव हाणून पाडून एकसंधपणे काम करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत व्यक्त केला.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू झाले. या पार्श्वभूमीवर अधिकेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवन येथे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तसेच आमदारांची एकत्र बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्क मंत्री तसेच आमदार यावेळी उपस्थित होते. आपण तीन वेगवेगळे पक्ष आहोत. इतकी वर्षे वेगळय़ा भूमिका घेऊन आपण राजकारण केले. आता त्या सोडण्याचा आग्रह कोणाला धरता येणार नाही. पण महाविकास आघाडीचे सरकार आपण किमान समान कार्यक्रमाकरच चालविले पाहिजे. विरोधक आपल्यातील दरी रुंदावण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहेत. पण आपण तिन्ही पक्षांनी एकसंध राहून त्यांचे मनसुबे हाणून पाडू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एकमेकांवर कुरघोडी नको!

एकमेकांकर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आपण करू नये. स्थानिक पातळीकरील राजकारणातदेखील आपण एकसंधता ठेवली पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही हीच भूमिका मांडताना सर्वसहमतीने कारभार चालकला जाईल असे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या