ठाकरे कुटुंबीय आणि टाटांचा सदैव ऋणानुबंध राहिला. शिवसेना पक्षप्रमुख आणि जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार उद्धव ठाकरे यांनी रतन टाटा यांचे खास फोटोसेशनही केले होते. त्या आठवणींना उद्धव ठाकरे यांनी आज उजाळा दिला. उद्धव ठाकरे यांनी टिपलेली टाटांची दोन छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहेत. त्यातील एका फोटोत टाटा आणि टायगर आहे तर दुसऱ्या फोटोत टाटांचा करारी बाणा दिसत आहे. टाटांचे फोटो काढण्याचे भाग्य मला लाभल्याचा विशेष उल्लेख उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात केला आहे.