Live – उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्राला उद्देशून संबोधन

 • महाराष्ट्रातल्या जनतेचा ऋणी आहे. असं क्वचित होत असेलकी एखादा माणूस अनपेक्षितपणे आल्यानंतर तो आपलं पद सोडताना लोकं रडतात, ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत त्या अश्रूशी माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही. तुमचे अश्रू ही माझी मोठी ताकद आहे. या ताकदीसोबत मी कधीही हरामखोरपणा करणार नाही.
 • मला दिलेला शब्द पाळला असता तर किमान अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, आता पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार नाहीये.यात भाजपला , भाजपच्या मतदारांना काय आनंद आहे ? यातून जनतेला काय मिळणार आहे हे लवकरच कळेल
 • माझ्यासोबत अमित शहांनी जे ठरवलं होतं, तो शब्द त्यांनी पाळला असता तर हे सरकार शानदारपणाने आलं असतं.
 • मतांचा बाजार जर अशा पद्धतीने मांडला जात असेल तर ते देशाच्या दृष्टीने घातक आहे.
 • देशाला 75 वर्षे पूर्ण झाली, या काळात लोकशाहीची काय धिंडवडे निघालेत! हे धिंडवडे आता थांबवण्याची गरज आहे.
 • माहीमच्या मतदाराने टाकलेलं मत जर व्हाया सूरत व्हाया गुवाहाटी व्हाया गोवा असं फिरायला लागलं आणि मतदारालाच कळालं नाही की आपलं मत कुठून कुठे फिरतंय आणि त्याच्याचपासून मत गुप्त राहायला लागलं तर लोकशाही आहे कुठे ?
 • सुरुवात आम्ही केली ना! आम्ही मविआचं सरकार स्थापन केलं होतं ना! शिवसेनाप्रमुख जे म्हणायचे की मतदाराला आपण मत देऊन निवडून आलेल्या आपल्या प्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार असला पाहिजे. आम्ही जर त्यावेळी चूक केली होती तर मतदारांनी आम्हालासुद्धा परत बोलावण्याचा अधिकार त्यांना असायला हवा होता.
 • आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे, निदान ज्याने मतदान केलंय त्याला तरी कळालं पाहीजे की आपण कोणाला मतदान केलंय. त्याच्या गुप्त मतदानाची वाटचाल अशा पद्धतीने व्हायला लागली तर मतदाराचाही विश्वास लोकशाही वरील विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही.
 • चारही स्तंभानी लोकशाही वाचवायला पुढे आलं पाहीजे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे. लोकशाही कोसळली तर स्तंभांना काहीही अर्थ राहणार नाही.
 • आरेचा मर्यादीत वापर होणार होता. काजूरला कारशेड गेल्यास मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल
 • ही जमीन महाराष्ट्राची आहे, ती मुंबईच्या हितासाठी वापरा.
 • तिथे पर्यावरणासाठी आवश्यक असलेलं जंगल एका रात्रीत कत्तल करण्यात आलं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मी त्यांना कांजूरमार्गचा पर्याय दिला. मी पर्यावरणवाद्यांच्या आणि पर्यावरणाच्या सोबत आहे. जेव्हा असा संभ्रम निर्माण होतो तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी असं माझं मत आहे. आजही माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. झाडं कापल्याने तिथलं वन्यजीवन नष्ट झालेलं नाही. कालांतराने तिथे रहदारी सुरू झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील वन्यजीवन धोक्यात येईल.
 • आरेचा निर्णय त्यांनी जो बदलला त्याने मला खरंच दु:ख झालंय.
 • कदाचित आज पहिल्या प्रथम माझा चेहरा तुम्हाला पडलेला दिसेल, कारण मला आज खरंच दु:ख झालंय ते एका गोष्टीचं माझ्यावर राग आहेना माझ्यावर राग काढा, माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. माझा राग मुंबईवर काढू नका
 • भाजपसोबत जाऊ इच्छितात किंवा गेले आहेत त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारला पाहीजे की अडीच वर्षापूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि ज्यांनी अशा प्रकारे पाठीत वार करून पुन्हा एकदा शिवसैनिकात संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री…हा तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.
 • त्या वेळेला नकार देऊन आता हे भाजपने असं का केलं हा माझ्यासह महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न आहे
 • जी आताची जोडगोळी आहे तिने अशाच पद्धतीने अडीच वर्ष पूर्ण केलं असतं
 • तसं झालं असतं तर जे आज घडलं ते सन्मानाने झालं असतं
 • जे माझं आणि अमित शहा यांचं ठरलं होतं की शिवसेना आणि भाजपने अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा काळ वाटून घ्यावा
 • हेच मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो
 • ज्यांनी हे सरकार स्थापन केलं त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केला
 • 3 प्रश्न माझ्यासमोर आहेत