सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना भरचौकात फटकावले पाहिजे!

609
uddhav thackeray

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्यांना भरचौकात फटकवा. त्याशिवाय त्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व कळणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले.

शेतकरी विमासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. दिल्ली विद्यापीठ आवारात असलेल्या सावरकरांच्या पुतळ्याची गुरुवारी विटंबना झाली. काँग्रेसप्रणीत एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने ते कृत्य केल्याचे समजते असे यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणले असता त्यांनी त्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. सावरकरांना जे लोक मानत नाहीत त्यांना भरचौकात फटकवायला पाहिजे त्याशिवाय स्वातंत्र्यासाठी कुणी काय खस्ता खाल्ल्यात हे कळणार नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनीही सावरकरांचा अवमान केला होता. ही जी औलाद आहे तिला स्वातंत्र्याचे महत्त्व कळणार नाही, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यावरून विद्यापीठात वाद सुरू होता. एसएसयूआयचा दिल्लीचा प्रमुख अक्षय लाकरा याने आपल्या पदाधिकाऱयांसह गुरुवारी दिल्ली विद्यापीठात घुसून स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यानंतर विद्यापीठात तणावाचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या