शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ते महाविकास आघाडीच्या दिल्लीतील नेत्यांची भेट घेणार आहेत.
मंगळवारी उद्धव ठाकरे दिल्लीला पोहोचताच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भेट घेतली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, रमेश चेन्नीथला व जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतील असे सांगितले.
”उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिल्लीत आहे. त्यामुळे आता आम्ही सर्व एकत्र बसणार म्हणजे आम्ही महाराष्ट्राविषयीच चर्चा करणार. लोकसभा निवडणूक आम्ही जिंकली आहे. विधानसभेत आम्हाला बहुमत आणायचे आहे”, असे संजय राऊत यांनी सांगितले.