उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर, सांगली, सातारा दौरा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवार, २४ ते रविवार, २६ नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर, सांगली, सातारा दौऱयावर जाणार असून या दौ-यात ते शेतकरी, कामगार आणि व्यापारीवर्गाशी संवाद साधणार आहेत. या दौऱयात त्यांच्या जाहीर सभाही होणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम.

२४ नोव्हेंबर – चंदगड तालुक्यातील शितोळी येथे शेतकरी संवाद आणि करवीर तालुक्यातील उचगाव येथे कामगारांशी संवाद, गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे आणि कुंभी कासारी साखर कारखाना येथे जाहीर सभा. शिवाय कोल्हापूर शहरातील शनिवार पेठ येथे ई-रिक्षा वाटप कार्यक्रमही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

२५ नोव्हेंबर – कोल्हापूर शहरातील आणि जयसिंगपूर येथील व्यापाऱयांशी संवाद, शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे शेतकरी संवाद, बसस्थानकाचे उद्घाटन. दुपारी कुरुंदवाड येथील एस. पी. हायस्कूल प्रांगणात जाहीर सभा होणार असून सायंकाळी मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूल मैदानात शेतकरी मेळावा होणार आहे.

२६ नोव्हेंबर – सकाळी तासगावमधील बोरगावच्या आणि कार्वे येथील शेतकऱयांशी संवाद तर दुपारी कडेगाव येथे शेतकरी भेट आणि ओगळेवाडी येथे शेतकरी संवाद कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी कराड नगरपालिकेच्या जनता व्यासपीठ येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होईल, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या