आश्वासने अपूर्ण, मग दरवर्षी अर्थसंकल्पाची गरजच काय ?

58

सामना ऑनलाईन, पणजी

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना परखड भाष्य केलं. तुम्ही मनाला वाटेल तेव्हा मनचाही बात करता , गेल्या वर्षीची आश्वासने अद्याप अपूर्ण आहेत.जर जनतेला दिलेली आश्वासने पूर्णच होत नाही तर मग दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची गरजच काय? यासाठी तुम्हाला बहुमत हवं आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.

विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्यांनी हजारो कोटी रूपयांची कर्ज बुडवली. “देशाची तिजोरी रिकामी झाली, कर्जबुडवणाऱ्यांनी देशाला लुबाडलं. या लोकांचं कर्ज सामान्य जनतेनं भरलंय. नोटाबंदीनंतर बँकेत पैसे आले ते सर्वसामान्य जनतेने त्या कर्ज बुडवणाऱ्यांचं कर्ज फेडलं असं मी मानतो” असं उद्धव ठाकरे म्हणाले.नोटाबंदीमुळे जनतेला सोसावी लागणारी झळ कधीही भरून निघणार नाही असं ते म्हणाले

या अर्थसंकल्पात ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न आयकरातून मुक्त करणं गरजेचं होतं असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसंच ज्येष्ट नागरीक बँकांमध्ये एफडी ठेवत असतात त्यावर त्यांना जास्त व्याजदर देणं गरजेचं आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या