शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सामना ऑनलाईन । धाराशिव
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित तालुका शिवसेनेच्या वतीने शुक्रवार दिनांक २७ जुलै रोजी रक्तदान शिबीर, निराधार महिलांना साड्याचे वाटप आदी कार्यक्रमासह विविध सामाजिक उपक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.
तालुका शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव – संभाजीनगर मार्गावर असणार्‍या समर्थ मंगल कार्यालयात सकाळी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीराबरोबरच इच्छुक कार्यकर्त्यांकडून अवयवदानाचे फॉर्मही भरुन घेण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे शहरातील निराधार महिलांना दोनशे साड्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच धाराशिव शहरातील रुग्णालयातील रुग्णांना विविध मान्यवरांच्या हस्ते खाऊ व फळाचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे धाराशिव शहरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तालुक्यातील तेर येथेही उद्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमास शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक व नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख सतिश सोमानी यांनी केले आहे.
तेजस सुपरस्ट्रक्चरच्या वतीनेही वृक्षारोप
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता पोलिस मुख्यालयासमोर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ४०० झाडाचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील तुळजापूर येथेही धाराशिव रस्त्यावर तसेच तुळजापूर येथील पाणी टाकीच्या पार्किंग जवळ १०० झाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्षारोपण कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संजय निंबाळकर यांनी केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या