‘खरा कायदेपंडित’, शिवसेनेने सच्चा मित्र गमावला

1941

देशात मोठे वकील खूप आहेत, पण कायदेपंडितही उपाधी ज्यांना शोभून दिसत होती असे फक्त राम जेठमलानीच होते. त्यांच्या जाण्याने कायदा व न्याय क्षेत्रातील एक स्तंभ कोसळला आहे, अशा भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

राम जेठमलानी व शिवसेनाप्रमुखांचे नाते जिव्हाळ्याचे होते. शिवसेनेच्या पाठिंब्याने ते राज्यसभेतही गेले. काही खटल्यात त्यांनी शिवसेनाप्रमुखांची बाजू भक्कमपणे मांडली. शिवसेनेच्या व्यासपीठांवरही ते अनेकदा आले अशा आठवणींना उद्धव ठाकरे यांनी उजाळा दिला.

राम जेठमलानी हे स्वभावाने परखड होते. त्यांच्या भूमिकांवर वाद निर्माण झाले, पण कायदा क्षेत्रातील ते एक स्वतंत्र संस्थान होते व जेठमलानी यांच्या मतास किंमत होती. 95 वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभले. त्यांच्या जाण्याने शिवसेनेने सच्चा मित्रगमावला आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच संपूर्ण शिवसेना परिवारातर्फे जेठमलानी यांना आदरांजली वाहिली,

आपली प्रतिक्रिया द्या