
युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला मोठा धक्का बसला आहे. रशियाला क्रीडा जगतातून मोठा झटका सहन करावा लागला आहे. UEFA चॅम्पिअन्स लीगचे अंतिम सामने रशियातील सेंट पिटर्सबर्गमध्ये होणार होत्या. मात्र, आता रशियाने या सामन्यांचे यजमानपद गमावले आहे. UEFA ने तातडीची बैठक घेत हा निर्णय घेतला आहे. आता या सामन्यांचे अंतिम सामने रशियात होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
UEFA ने याबाबतची तातडीची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. आता चॅम्पिअन्स लीगचे अंतिम सामने फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होणार आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत आहे. तसेच क्रीडा जगतानेही चॅम्पिअन्स लीगचे यजमानपद रशियाकडून हिरावले घेतले आहे.
UEFA चे अध्यक्ष अलेक्सांद्र रिफरीन यांनी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इम्युनुएल मँको यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चॅम्पिअन्स लीगचे अंतिम सामने 28 मे रोजी सेंट पिटर्सबर्गमध्ये होणार होते. आता अंतिम सामने ठरलेल्या वेळी पॅरिसमध्ये होणार आहेत. 2006 नंतर पहिल्यांदाच चॅम्पिअन्स लीगचे अंत्म सामने पॅरिसमध्ये होणार आहे.
चॅम्पिअन्स लीगच्या अंतिम सामन्यात रशियात होणाऱ्या आगामी फुटबॉल सामन्यांबाबतही UEFA विचार करत आहे. त्यासोबत युक्रेनच्या संघातील सामन्यांबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. या वर्षाच मार्च महिन्यात रशियाच्या संघाचे पोलंडसोबत सामने होणार आहेत. तसेच युक्रेन आणि स्कॉटलँडमध्ये फुटबॉल सामने होणार आहेत. हे सामनेही रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे. याआधी पोलँड, झेक रिपब्लिक आणि स्वीडनने रशियात कोणतेही सामने खेळण्यास नकार दिला आहे.
रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये घुसून हल्ला केला आहे. रशियाच्या सैन्याची आगेकूच सुरू असून येत्या 4 दिवसात ते युक्रेनची राजधानी कीववर ताबा घेतील, अशी भीती युक्रेनच्या राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे. या युद्धामुळे क्रीडा जगतात विशेषकरून फुटबॉल सामन्यांवर सावट आहे. काही देशांनी फुटबॉल संघटनेकडे निषेध व्यक्त करत चॅम्पिअन्स लीगचे अंतिम सामन्यांचे यजमानपद हिरावण्यात आले आहे.