
जगभरात अनेक ठिकाणी समलैंगीक संबधांना मंजूरी दिली असताना आफ्रिकेमध्ये समलैंगीक संबंधांवर बंदी घालण्यात आली आहे. आता यामध्ये युगांडाचाही समावेश झालेला आहे. मंगळवारी तिथल्या संसदेत एलजीबीटीक्यूला गुन्हा ठरवण्याचा कायदा पास झाला आहे. त्यामुळे जर कोणी लैंगीक संबंध ठेवल्यास तो अपराध मानला जाईल.
या विधेयकात गंभीर समलैंगीकबाबत मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद केली आहे. या विधेयकाने अधिकाऱ्यांना शक्ती मिळेल ज्याने ते लोकांवर कारवाई करु शकतील. ह्युमन राईट्स वॉचनुसार कायदा केवळ लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्वीअर ओळख सांगणारा कायदा आहे. 30 हून अधिक आफ्रिकी देशांमध्ये आता युगांडाचाही समावेश झाला आहे. या नव्या कायद्याचे समर्थन करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एलजीबीटीक्यूला व्यापक श्रेणीत दंड करण्याची गरज आहे. अशी लोकं आफ्रिकी लोकांच्या पारंपारिक मुल्यांसाठी धोकादायक आहेत. हा कायदा समलैंगिक व्यतिरिक्त समलैंगिकतेला प्रोत्साहन देणाऱ्यासाठीही लागू आहे. त्यांनाही कठोर शिक्षा मिळेल.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यासाठी गंभीर शिक्षेचीही तरतूर आहे. मृत्यूदंडाबरोबरच आजिवन कारावासाचाही यामध्ये समावेश आहे. उत्तेजित समलैंगिकतामध्ये 18 वर्षाहून कमी वयाच्या लोकांसोबत किंवा जेव्हा गुन्हेगार जेव्हा अपराधी एड्सग्रस्त असतो तेव्हा समलिंगी लैंगीक संबंध समाविष्ट असतात. विधेयकावरील चर्चेदरम्यान खासदार डेव्हिड म्हणाल्या की, जे काही होत आहे, याने आमचा निर्माता देव आनंदी आहे. मी माझ्या मुलांच्या भविष्याची रक्षा करण्यासाठी या विधेयताचे समर्थन करते. हे आपल्या देशाचे सार्वभैमत्वाच्याबाबतीत आहे. कोणीही आम्हाला ब्लॅकमेल कोणी आपल्याला घाबरवू, कोणीही आम्हाला घाबरवू नये. या कायद्याबाबत सही करण्यासाठी राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांना पाठवले जाईल, मात्र मुसेवेनी यांनी या प्रस्तावावर कुुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण बऱ्याच दिवसांपासून एलजीबीटी हक्कांना ते विरोध करत आहेत. 2013 मध्ये त्याने एलजीबीटी विरोधी कायद्यावर सही केली ज्याचा पाश्चात्य देशांनी निषेध केला होता.