बाई निघाली बाप्या, लग्नानंतर झाला भांडाफोड

7174

युगांडातील एक तरुण इमामाचे दोन आठवड्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नानंतर आपल्या नववधूसोबत मधुचंद्र साजरा करण्याची स्वप्न पाहणाऱ्या त्या इमामाला जबरदस्त धक्का मिळाला आहे. या इमामाची पत्नी ही महिला नसून ती पुरुष असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमामाच्या तक्रारीवरून अटक केली आहे.

मोहम्मद मुटुंबा असे त्या तरुण इमामाचे नाव आहे. त्याचे काही दिवसांपूर्वी एका तरुणीसोबत सूत जुळले होते. त्याने तिच्याकडे सेक्सची मागणी केली. मात्र आपण लग्नानंतरच सेक्स करणार असे त्या तरुणीने इमामाला सांगितले. सेक्स करण्यासाठी अधीर झालेल्या त्या इमामाने अवघ्या काही दिवसांच्या ओळखीत त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. विधीवत त्यांचा निकाह देखील पढला गेला. मात्र नंतर जे काही घडले ते भयंकर होते.

मधुचंद्राच्या रात्री इमामाच्या नववधूने त्याला तिची मासिक पाळी सुरू असल्याचे सांगून थोडे दिवस थांबण्यास सांगितले. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर इमामाच्या शेजाऱ्यांनी त्याला तुझी पत्नी भिंतीवरून उडी मारून आमच्या घरात शिरली होती व आमच्या घरात तिने चोरी केली असे सांगितले. तसेच त्यांनीच त्याची पत्नी पुरुष असल्याचे इमामाला सांगितले. ते ऐकुन त्याला धक्का बसला. त्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर महिला पोलिसांनी जेव्हा तिची तपासणी केली तेव्हा ती पुरुषच असल्याचे सिद्ध झाले.

आपली प्रतिक्रिया द्या