मान्यताप्राप्त जर्नल्समध्ये प्रबंध प्रकाशित झालेल्या प्राध्यापकांनाच बढती

252
UGC

मान्यताप्राप्त जर्नल्समध्ये ज्यांचे प्रबंध प्रकाशित झाले आहेत त्या प्राध्यापकांचाच बढती आणि नियुक्त्यांमध्ये विचार केला जावा असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना बजावले आहे. संदर्भ घेण्यासाठी यूजीसीने 800 मान्यताप्राप्त जर्नल्सची यादीही आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

यापूर्वी यूजीसीने पाच हजार जर्नल्सची यादी दिली होती. परंतु तज्ञांच्या समितीने त्या जर्नल्सची छाननी केल्यानंतर त्यातील 88 टक्के जर्नल्स ही मान्यता नसलेली आणि बोगस आढळली होती. ती वगळून आता यूजीसीने 800 जर्नल्सची यादी जाहीर केली आहे. प्राध्यापकांच्या नियुक्त्या आणि बढती करताना या जर्नल्सचा संदर्भ घेतला जावा अशा सूचना यूजीसीने दिल्या आहेत. बरोबरच चांगले प्रबंध मान्यता नसलेल्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले असतील तर त्याचाही आढावा तज्ञ समितीकडून घेतला जाणार आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात दर्जेदार संशोधन व्हावे हा यामागचा उद्देश आहे. दर्जेदार संशोधन न करणाऱयांचीही उच्च शिक्षण संस्थांमध्ये वर्णी लावण्यात येत असल्याबद्दल यूजीसीकडे तक्रारी आल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या