हिंदुस्थानच्या माजी सहप्रशिक्षकांचा खुलासा, खेळाडूंना सेक्सचा सल्ला देणे …

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडियाच्या खेळाडूंना क्रिकेट सामन्यापूर्वी सेक्सचा सल्ला देणे माझी सर्वात मोठी चूक होती, असा खुलासा हिंदुस्थानचे माजी मेंटल कंडीशनिंग कोच पॅडी अप्टन यांनी केला आहे. पॅडी अप्टन यांनी आपल्या ‘द बेयरफुट कोच’ पुस्तकामध्ये याचा उल्लेख केला आहे.

पॅडी अप्टन हे हिंदुस्थानी संघाचे माजी मेंटल कंडीशनिंग कोच आहेत, तर सध्या आयपीएलमधील राजस्थान रॉयलचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. नुकत्याच आलेल्या त्यांच्या पुस्तकामध्ये अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी दिसून आल्या आहेत. या पुस्तकामध्ये त्यांनी खेळाडूंना सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला दिला होता याचाही उल्लेख आहे.

paddy

पुस्तकामध्ये अप्टन म्हणतात, मी टीम इंडियाच्या खेळाडूंना एका कोणताही प्रयोग करण्याचा सल्ला दिला नव्हता. मी फक्त असे सांगितले की असे होऊ शकते, परंतु मीडियाने याचा चुकीचा अर्थ लावला. तो फक्त एक विनोद होता. परंतु मी तसा विनोद करणे हिच माझी चूक होती. तसेच हिंदुस्थानचे त्या वेळचे मुख्य प्रशिक्षक गऐरी कर्स्टन यांना त्यांच्या वक्तव्याचा रागही आला होता.

पॅडी यांनी आपल्या पुस्तकामध्ये राहुल द्रविड ते गौतम गंभीर या खेळाडूंचाही उल्लेख केला आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या तयारीदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी काही नोट्स तयार केल्या होत्या. यात त्यांनी सेक्सच्या फायद्यांचा उल्लेख केला होता. शारीरिक संबंध ठेवल्याने आपले प्रदर्शन अधिक चांगले होऊ शकतो का? हो, यात वाढ होऊ शकते, असे नोट्स त्यांनी लिहिले होते. याला उल्लेख त्यांनी पुस्तकात केला आहे.