१२ वेबसाईट आणि अॅप्लिकेशन बंद करण्याचे सरकारचे आदेश

38

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नागरिकांना विशेष ओळख क्रमांक म्हणजेच आधार कार्ड देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष ओळख प्राधिकरण (युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडीया) ने १२ वेबसाईट आणि १२ मोबाईल अॅप्लिकेशन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आधार कार्ड काढण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे उकळणे,नागरिकांची दिशाभूल करणे अशा कारणांमुळे हे आदेश देण्यात आलेले आहेत.

ज्या बेवसाईट आणि अॅप्लिकेशनना बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्या नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी, पीव्हीसी कार्ड देण्यासाठी अशा वेगवेगळ्या सुविधा देण्याचं आश्वासन देत होत्या. नागरिकांकडून पैसे तर घेतले जायचेच शिवाय त्यांची गुप्त माहिती देखील या वेबसाईट आणि अॅप्लिकेशन जमा करत होत्या. हा उपक्रम सरकारचा असून त्यासाठी कोणतेही पैसे घेतले जात नाहीत. सरकारच्या अधिकृत संस्था, वेबसाईटद्वारेच आधारसाठी नोंदणी, पीव्हीसी कार्ड बनवणे, नुतनीकरण केले जाते. मात्र या वेबसाईट आणि अॅप्लिकेशन सरकारी नियमाचा भंग करून नागरिकांना खोटी आश्वासने देत माहिती आणि पैसे उकळत असल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या या वेबसाईट आणि अॅप्लिकेशनविरूद्ध कठोर कारवाई करण्यात आली नाहीये.मात्र जर आदेशानंतरही या वेबसाईट आणि अॅप्लिकेशन बंद झाली नाही तर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या