हिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा!

सामना ऑनलाईन । लंडन

ब्रिटनमधील ब्रिस्टेल येथील एमथिस्ट रील्म नावाच्या महिलेने खळबळजनक दावा केला आहे. आपण भूताशी संभोग केला असून आपण घोस्ट बेबीची वाट पाहत आहोत असे तिने सांगितले. प्रियकरासोबत एमथिस्टचे लग्न ठरले होते. त्यांच्या साखरपुडाही झाला होता. तिचा प्रियकर कामानिमित्त बाहेरगावी असायचा. या काळात एमथिस्ट एका भूताच्या संपर्कात आली आणि त्यांच्यात प्रेम झाले. तिच्या प्रियकराला तिच्यावर संशय आल्याने तिने त्याच्याशी ब्रेकअप केले आहे. आपण सध्या भूतासोबत राहत असून आपण घोस्टबेबीचा विचार करत आहोत असे तिने सांगितले. आपण भूतला पाहू शकत नाही. मात्र, त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो आणि त्याचे अस्तित्व मला जाणवते असे तिने सांगितले.

आपण गेल्या 11 वर्षापासून भूतांच्या संपर्कात असल्याचे एमथिस्टने सांगितले. मात्र, यावेळी या भूताच्या संपर्कात आल्याने आपल्याला योग्य जोडीदार मिळाल्याचे वाटले आणि आपण त्याच्याशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे तिने सांगितले. एकदा एका झुडपाजवळ फिरत असताना मला काहीतरी जाणवले. अचानक शरीरात उर्जेचा शिरकाव झाल्याचे जाणवले आणि हेच आपले खरे प्रेम असल्याचे तिने सांगितले. ही आमची पहिली भेट मी कधीच विसरू शकत नाही असेही ती म्हणाली. मी त्याला बघू शकत नाही. मात्र आम्ही तासनतास गप्पा मारतो आणि संभोग करतो असे तिने सांगितले. पुरुषांच्या संभोगापेक्षा भूतांशी संभोग करण्यात वेगळेच थ्रिल असल्याचे तिने सांगितले. आतापर्यंत माझ्या संपर्कात आलेल्या 14 भूतांशी संभोग केल्याचा दावाही तिने केला आहे. आता आम्ही दोघे रिलेशनशिपबाबत गंभीर असून मुलाला जन्म देण्याच्या विचारात आहोत. जगाला याबाबत आश्चर्य वाटेल मात्र माझ्यादृष्टीने यात अशक्य काही नाही असेही ती म्हणाली. आपण संपर्कात असलेल्या भूताचे नाव नाही. वास्तविक त्यांच्या जगात नाव आणि वय आणि लिंग याला काहीही महत्व नसते. त्याला सुमारे 300 वर्षापूर्वी फाशीची शिक्षा झाली होती. तेव्हापासून तो भूतयोनीत असून खऱ्या प्रेमाच्या शोधात होता. मी भेटल्यानंतर त्याचा शोध थांबला आणि त्याला शांतता मिळाली असा दावाही तिने केला आहे. त्याच्या आवाज खोल, गंभीर आणि आकर्षक असल्याचे तिने सांगितले. त्याच्याशी संपर्कात आल्यावर आपल्यातली उर्जा वाढत असल्याचेही तिने सांगितले.

एमथिस्टने केलेल्या दाव्यांमुळे खरेच भुते असतात का याबाबतच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. एमथिस्ट जे सांगत आहे, त्यात किती तथ्थ आहे ते तपासावे लागेल. तिला कोणता मानसीक आजार तर नाही ना याचीही खात्री करावी लागेल असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.