पद्मावतीला देशात वाढता विरोध, इंग्लंडमध्ये प्रदर्शनाला परवानगी

25

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने या समाजाने पद्मावती या चित्रपटाला प्रखर विरोध केला आहे, त्यांच्याविरोधामुळे अनेक राज्यांनीही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये मात्र या चित्रपटाला सेन्सॉर सर्टीफिकेट मिळालं आहे. याचाच अर्थ हा आहे की तिथे हा चित्रपट दाखवला जाणार असून, १ डिसेंबरला हा चित्रपट तिथे प्रदर्शित केला जाणार आहे.

हिंदुस्थानात हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित करण्याचं ठरलेलं होतं, मात्र देशभरातून होत असलेल्या विरोधामुळे प्रदर्शनाची तारीख टाळण्यात आलेली असून नवी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. करणी सेनेच्या लोकेंद्रसिंह कालवी यांनी प्रदर्शनाची तारीख कोणतीही ठरवा आम्ही त्याला  विरोध करु आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या