कर्जबुडव्या विजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा निकाल

हिंदुस्थानातील 17 बँकांचे 9 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज बुडवणाऱया विजय मल्ल्याला लंडन हायकोर्टाने आज दिवाळखोर म्हणून घोषित केले. या निकालामुळे आता त्याची संपत्ती जप्त करण्याचेही मार्ग खुले झाले आहेत. हिंदुस्थानातील बँकांचे कर्ज न फेडताच तो ब्रिटनला पळाला होता.

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानचे प्रयत्न सुरू असतानाच लंडन हायकोर्टाने आज मल्ल्याला दिवाळखोर म्हणून घोषित करून जबरदस्त झटका दिला. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात हिंदुस्थानी बँकांच्या कंसोर्टियमने मल्ल्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीशी संबंधित खटलादेखील जिंकला आहे. बँकांच्या कंसोर्टियमने लंडन हायकोर्टाकडे मागणी केली होती की, मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करावे. हिंदुस्थानी बँकांच्या या याचिकेवर झालेल्या व्हर्च्युअल सुनावणीत लंडन हायकोर्टाने बँकांच्या बाजूने निकाल देत, हायकोर्टाचे विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या