ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांचा हिंदुस्थान दौरा रद्द

हिंदुस्थानात कोरोना रुग्णसंख्येचा होणारा विस्फोट पाहता इतर देशांनी मोठा धसका घेतला आहे. हिंदुस्थानातील कोरोनाचे थैमान नियंत्रणाबाहेर गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला हिंदुस्थान दौरा रद्द केला आहे. या आठवडय़ात ते हिंदुस्थान दौऱ्यावर येणार होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता त्यांनी नियोजित दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. बोरिस जॉन्सन यांनी दुसऱ्यांदा हिंदुस्थान दौऱ्यावर येण्याचे टाळले आहे. यापूर्वी 26 जानेवारीला मुख्य अतिथी म्हणून ते हिंदुस्थानात येणार होते. मात्र तेव्हाही त्यांनी येण्याचे टाळले होते. सध्याच्या कोरोना स्थितीमुळे हा निर्णय त्यांनी घेतल्याचे ब्रिटन परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे, बोरिस जॉन्सन यांच्या नियोजित हिंदुस्थान दौऱ्याला ब्रिटनमध्ये जोरदार विरोध होत होता. त्यामुळे हा निर्णय घेतला असेही बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या