इंग्लंडमधल्या पॉर्नस्टार्सने दिली कामबंदची हाक

Photo Courtesy - Canva.com

इंग्लंडमधल्या बहुसंख्य पॉर्नस्टार्सनी (अश्लील चित्रपटात काम करणारे कलाकार) कामबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमध्ये सिफीलीस या गुप्तरोगाचा उद्रेक झाल्याने या पॉर्नस्टार्सनी हा निर्णय घेतला आहे. या कलाकारांनी एक संघटना स्थापन व्हावी यासाठी हाक दिल्याचे वृत्त ‘इंडिपेंडंट’ नावाच्या वर्तमानपत्राने दिले आहे. सिफीलीस हा असुरक्षित शरीरसंबंधांमुळे होणारा रोग असून त्याचा परिणाम त्वचेवर होत असतो. या रोगाचा इलाज असून औषधांमुळे हा रोग बरा होतो, असे असले तरी पॉर्नस्टार कोणतीही जोखीम उचलायला तयार नाहीयेत. कोरोनाच्या लाटांमुळे हे सगळे पॉर्नस्टार घाबरले असून तेव्हापासून त्यांनी अत्याधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

सिफीलीस या गुप्तरोगाचा वेळीच उपचार केला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या रोगाचा शरीरातील अंगांवर परिणाम होतो आणि मेंदूलाही इजा होऊ शकते. इंग्लंडमध्ये पास (PASS) नावाची एक संस्था आहे. ही संस्था पॉर्नस्टारने सुरक्षित शारिरीक संबंधांसाठी ते निरोगी असल्याचे प्रमाणपत्र देत असते. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय की सिफीलीसने ग्रासलेल्या पॉर्नस्टारची संख्या अचानक वाढली आहे. या पॉर्नस्टारमुळे या रोगाची इतरांनाही लागण होण्याची भीती आहे असा इशारा ‘पास’ने दिला आहे. यामुळे घाबरलेल्या पॉर्नस्टारनी त्यांचे काम थांबवले असून यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे.