स्वच्छता गृहात गेली आणि आई झाली; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

2094

जगात अशा अनेक घटना घडत असतात ज्याच्यावर विश्वास ठेवणं कधी कधी कठीण होत. गर्भावस्थेचा काळ हा देखील अशाच काही प्रसंगापैकी एक आहे. जे समजून घेणं आपल्यासाठी कठीण आहे. या 9 महिन्याच्या कालावधीत महिलांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडत असतात. या दरम्यान खाण्यापिण्यापासून ते महिलेच्या शरीरात बरीच बदल घडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. ही घटना युके मधील आहे. येथील एक महिला 9 महिन्यांची गरोदर होती आणि तिला या गोष्टीची माहितीच नव्हती. हे वाचून तुमचा विश्वास बसला नसेल. मात्र हो हे खरं आहे.

युके मधील राहणाऱ्या या महिलेचं नाव ग्रेस मीचिम आहे. ही घटना 6 महिन्याआधी घडली आहे. ग्रेस ही 9 महिन्यांची गरोदर होती. मात्र तिला या गोष्टीची माहिती नव्हती. 9 महिन्यांनंतर तिला अचानक पोटदुखी झाली. यावेळी ती बाथरूममध्ये गेली असताना तिने एका मुलीला जन्म दिला. तेव्हा तिला ती गरोदर असल्याचे समजले. याआधी महिलेचा नवरा जेम्स यालाही या गोष्टीची माहिती नव्हती.

sudden-birth-news-4-jpg

शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याआधी ग्रेस नियमित गर्भ निरोधक गोळ्या खात होती. यानंतरही बाळाचा जन्म झाल्याने ग्रेस आणि तिचा नवरा जेम्स याना धक्का बसला आहे. या जोडप्याला आधीच तीन मुले होती. दरम्यान, 5 डिसेंबर रोजी ग्रेसने मुलीला जन्म दिला. या चिमुकलीचं नाव त्यांनी सिएनाला असं ठेवलं आहे. याबद्दल बोलताना ग्रेस म्हणाली की, आपण गर्भवती आहोत हे आपल्याला माहित नसणं आणि अचानक एके दिवशी आपण एका बाळाला जन्म देणं, हे धक्कादायक आहे. आम्ही या बाळाच्या जन्माबाबत नियोजन केलं नव्हतं. पण तिच्या येण्याने आमचं कुटुंब आता परिपूर्ण झालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या