एलियनने अपहरण केल्याचा तरुणीचा दावा, पहिल्याच भेटीत एलियनच्या प्रेमात पडली

पहिल्याच भेटीत एलियनच्या प्रेमात पडल्याचा दावा ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने केले आहे. आश्चर्य म्हणजे एलियनने तिचे अपहरण केल्याचेही तिने म्हटले आहे.

जगभरात एलियनच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उभे असताना एका ब्रिटिश महिलेने मात्र ती एलियनच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे काही महिन्यांपूर्वी सांगितले आहे. इतकेच नाही तर यूएफओच्या (युनायटेड फ्लाईंग ऑब्जेक्ट) माध्यमातून बेडरूममधून एलियनने तिचे अपहरण केले होते, असेही तिचे म्हणणे आहे. अब्बी बेला असे या महिलेचे नाव असून ती अभिनेत्री आहे.

ती सांगते, एका कामानिमित्त तिची एलियनसोबत भेट झाली. त्यानंतर एलियनच्या प्रेमामुळे मी रोज रात्री पांढर्‍या प्रकाशाविषयी स्वप्न पाहायला सुरुवात केली. एके दिवशी सायंकाळी मी माझ्या बेडरूममध्ये खिडकी उघडून बसले होते. तेव्हा बाहेर उडणारी तबकडी दिसली. खरतर तेव्हा मी झोपायला जात होते, पण प्रखर हिरव्या रंगाच्या प्रकाशाने मला यूएफओच्या आत नेले.’

अब्बी सांगते की, ज्या एलियनच्या ती प्रेमात पडली आहे तो एंड्रोमेडा गॅलेक्सी या आकाशगंगेवरून आला होता, मात्र तो आता पुन्हा त्याच्या येण्याची वाट पाहात असून पृथ्वीवरील पुरुषांविषयी आता मला तिरस्कार वाटतो म्हणून एलियननेच माझे अपहरण करावे, अशी इच्छा असल्याचेही अब्बीचे म्हणणे आहे.

अभिनेत्री अब्बीने असा दावा केला आहे की, तिचे अपहरण केल्यानंतर यूएफओमध्ये तिला 5 एलियंस दिसले होते. ते खूप उंच आणि बारीक होते. यामध्ये एक एलियन मनुष्याप्रमाणे दिसणारा होता. त्याने माझ्याशी संभाषण केल्याची तिला जाणवले असे तिचे म्हणणे आहे.

एलियन अब्बीला त्याच्यासोबत येण्याविषयी विचारत आहे, पण तिने त्याला होकार दिला नाही, कारण अब्बीला तो कायम तिला त्याच्यासोबत घेऊन जाईल, अशी भीती वाटली. तसेच ती 20 मिनिटे त्याच्यासोबत होती. त्यानंतर तिच्या घरी परतली, मात्र या दिवसानंतर ती दररोज रात्री एलियनसोबत जाण्याकरिता तिची बॅग भरून ठेवते आणि एलियनच्या परत येण्याची वाट बघते. “माझी एंड्रोमेडा गॅलेक्सी’ला जाण्याची इच्छा आहे, असं अब्बीचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या