घरमालकाने घर खाली करण्याची दिली नोटीस, संतप्त तरुणीने केले भयंकर कृत्य

एक तरुणी भाड्याच्या घरात राहत असूनही अनेक महिने घरमालकाला भाडेच देत नव्हती. अखेर संतप्त घरमालकाने तिला घर खाली करण्याची नोटीसच बजावली. मात्र नोटीस पाहून या तरुणीने असे कृत्य केले ज्याची कोणी कल्पनाही करणार नाही. अखेर न्यायालयाने या महिलेला 3 वर्ष 10 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

ही घटना ब्रिटनमधील मॅनस्टर येथील आहे. मीडिया वृत्तानुसार, या महिलेचे नाव जॉर्डिन लिडल असे आहे. 25 वर्षाची ही तरुणी अनेक महिन्यापासून घरमालकाला भाडे देत नव्हती. त्यामुळे न्यायालयाने तरुणीला घराबाहेर काढण्यासाठी टर्मिनेशन नोटीस दिली होती. ही तरुणी कधी कधी दारु पिऊन घरी पोहोचायची आणि त्या दिवशीही ती दारु पिऊन होती.

टर्मिनेशन नोटीस मिळाल्यानंतर तरुणीचा पारा चढला आणि तिने काही विचार न करता घराला आग लावली. हेही सांगण्यात आले आहे की, महिलेने घरात लायटरने आग लावली होती. दारुच्या नशेत तर्र असलेल्या लिडलने घरात आग लावली. सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर कळले की घर जळताना पाहण्यासाठी ती सारखी येऊन पाहत होती. तरुणीने घरमालकाच्या घराला आग लावल्यानंतर तिच्या मैत्रीणीकडे गेली होती आणि तिथल्या लोकांना आगीत काहीजण फसले असल्याचे सांगितले. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयाने तरुणीवर कडक कारवाई केली असून 3 वर्ष 10 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठाण्यात आली आहे.