युक्रेनमध्ये एअरफोर्सचे विमान कोसळले, 26 जणांचा मृत्यू

युक्रेनमध्ये एअरफोर्सचे विमान कोसळले असून यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सैन्य अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. पूर्व युक्रेनमधील खारकीव जवळ चुहिव सैन्य तळापासून 1 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. युक्रेनच्या मंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मंत्री एंटोन गेराशेंको यांनी सांगितले की, विमान अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या विमानात एकूण 28 जण होते, असेही त्यांनी सांगितले. विमानाचा अपघात कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या