ऑस्कर विजेत्या ‘नाटू- नाटू’ गाण्यावर थिरकले युक्रेनचे सैनिक, पहा व्हिडिओ

‘आरआरआर’ या हिंदुस्थानी चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकत चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास रचला आहे. या गाण्याचे केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चाहते आहेत. देश-विदेशातही अनेक ठिकाणी ‘नाटू-नाटू’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान आता युक्रेनच्या सैनिकांनादेखील ‘नाटू नाटू’ गाण्याचे वेड लागलेलं दिसत आहे. कारण सोशल मीडियावर युक्रेनच्या सैनिकांचा ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे बोल युक्रेनियन भाषेत आहेत.

सध्या युक्रेनच्या सैनिकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये युक्रेनी सैन्यातील दोन सैनिक ‘नाटू नाटू’ या गाण्यावर अभिनेता रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसारख्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. युक्रेन सैनिकांचा हा जबरदस्त डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.