कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले हे महत्त्वाचे आदेश

48

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कुलभुषण जाधव प्रकरणी हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायाल्यात हिंदुस्थानला मोठा विजय मिळला आहे. कुलभुषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पुर्नविचार करावा असा आदेश न्यायालयाने पाकिस्तानला दिला आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेला जी स्थगिती दिली होते ती कायम राहणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला तीन महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

फाशीच्या शिक्षेचा पुर्नविचार

हिंदुस्थानी नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेचा पुर्नविचार करावा असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. हिंदुस्थानी हेर म्हणून पाकिस्तानने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांनी दहशतवादी कारवाया केल्या असा आरोप पाकिस्तानने केला आहे. तर हिंदुस्थानने हे सर्व आरोप फेटाळले असून या शिक्षेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.  

कायदेशीर सुविधा 

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना सर्व राजनयिक सुविधा मिळाव्या असा आदेश दिला आहे. हिंदुस्थानने तशी मागणी केली होती ती मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. त्यानुसार आता हिंदुस्थानी उच्च अयोग जाधव यांची भेट घेऊन त्यांना वकील देऊ शकतात आणि कायदेशीर मदतही देण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.  

पाककडून विएन्ना कराराचे उल्लंघन

या खटल्यात हिंदुस्थानने जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यापैकी बहुतांशी मुद्दे न्यायालयाने योग्य ठरवले आहेत. या प्रकरणी न्यायालयाने पाकिस्तानला फटकारलेही आहे. पाकिस्तानने विएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे. या करारानुसार जाधव यांना अनेक अधिकार केले होते त्यापासून पाकिस्ताने त्यांना वंचित ठेवले.

आपली प्रतिक्रिया द्या