राहुल जिन्ना व प्रियंका जिन्ना वातावरण बिघडवताहेत, उमा भारतींचे वादग्रस्त विधान

817

देशाचे तुकडे करणारे जिन्ना वर गेले, मात्र राहुल जिन्ना आणि प्रियंका जिन्ना नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मुसलमानांमध्ये संभ्रम पसरवत आहेत आणि भीतीदायक वातावरण निर्माण करत आहेत, असे वादग्रस्त विधान भाजप नेत्या उमा भारती यांनी केले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा जिन्ना असा उल्लेख केल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

आमच्यापैकी कोणी कधी सोनिया गांधी यांचे वडील इटलीमध्ये मुसोलिनीच्या सैन्यामध्ये होते असा आरोप करतो का? असा सवाल उमा भारती म्हणाल्या की, सोनिया गांधी यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांनी आमच्या देशातीत तरुणाचे लग्न केले आणि त्या आमच्या देशाच्या सूनबाई आहेत.

जेएनयूवर विधान
याआधी उमा भारती यांनी रविवारी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारावर विधान केले. जेएनयूमध्ये एका विशिष्ट विचारधारा असणारे लोक विष कालवत आहेत. यावेळी उमा भारती यांनी अशा लोकांची तुलना एका विशिष्ट सापांशी केली आणि या सापाची संख्या कमी असली तरी हे विषारी आहेत, असेही त्या म्हणाल्या. त्यांना वेळीच ठेचले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या