तिसर्‍या दिवशीही शोधमोहीम थांबवली, दिव्यांश सापडलाच नाही!

31

सामना प्रतिनिधी । मुंबई

मालाडमध्ये उघड्या गटारात पडून काहून गेलेल्या दिव्यांश सिंहचा आज तिसर्‍या दिवशीही शोध लागलेला नाही. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, महापालिका कर्मचार्‍यांकडून बुधवारी रात्रीपासून दिव्यांशचा शोध सुरू आहे. शुक्रकारीही शोधकार्य युद्धपातळीकर सुरू होते, मात्र रात्री उशिरापर्यंत दिव्यांशचा शोध लागला नाही.

मालाड पूर्वेकडील आंबेडकर नगरात राहणारा दिव्यांश बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघड्या गटारात पडला. काही वेळातच दिव्यांशची आई त्याला शोधण्यासाठी घराबाहेर आली, मात्र दिव्यांश दिसत नसल्यामुळे तिने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून येथील लोक जमा झाले, मात्र दिव्यांश कुठेही न दिसल्याने जवळच असलेल्या मशिदीबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्हीमध्ये दिव्यांश गटारात पडल्याचे समजताच पोलीस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जकानांनी शोधकार्य सुरू केले. घटना घडली त्या दिवसापासून अग्निशमन दल या चिमुकल्याचा शोध घेत आहे.

ड्रोन कॅमेर्‍याचा वापर

अग्निशमन दल, पोलीस, एनडीआरएफ क पालिका कर्मचार्‍यांकडून रात्रंदिकस शोध सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जकानांनी ड्रेनेज लाइनची 10 किलोमीटरपर्यंत पाहणी केली. जेसीबीच्या सहाय्याने ड्रेनेज लाइन फोडून मुलाचा शोध घेतला तरीही गटारात पडलेल्या दिव्यांशचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करून शोध घेण्यात आला, मात्र रात्री उशिरापर्यंत दिव्यांशचा शोध लागला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या