माथेरानमधील ३६ अनधिकृत बांधकामे पाडणार

30

सामना ऑनलाईन । माथेरान 

हरित लवादाने माथेरान मधील अनधिकृत बांधकामे पाडण्याचा आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने माथेरान  पोलीस  ठाण्यात आज बुधवारी नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात अली. राष्ट्रीय हरित लवादाने  दिलेल्या  निकाला  नुसार  कारवाई करणे बंधनकारक असल्याचे मुख्याधिकारी सागर घोलप यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्यात  ३६ छत्तीस  बांधकामांवर  कारवाई होणार असल्याची माहिती त्यांनी या सभेत दिली.

मात्र नगर परिषदेला एकही बांधकाम तोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा सभेत ग्रामस्थांनी घेतला. यावर कायदा आणि सुव्यवस्था बाधित होईल असे कोणतेही कृत्य नागरिकांनी करू नये असे आवाहन पोलीस उपाधीक्षक विजय पांढरपट्टे यांनी केले.  माथेरानकरांनी आपले म्हणणे सनदशीर मार्गाने मांडावे.  यासभेस पोलीस उपअधिक्षक विजय पांढरपट्टे, नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, माथेरानचे अधीक्षक संतोष शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप  पोलीस उपनिरीक्षक  राजवर्धन खेबुडे यांच्यासह शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय सावंत ,काँग्रेस चे शहराध्यक्ष मनोज खेडकर, भाजपा चे शहराध्यक्ष विलास पाटील, आरपीआय चे अनिल गायकवाड , शेकापचे शफिक बढाणे स्वाभिमानचे  सागर पाटील यांच्यासह  आजी माजी नगरसेवक – नगरसेविका विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

माजी नगरसेवक प्रकाश सुतार माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर , शिवसेनेचे गट नेते प्रसाद सावंत यांनी माथेरानकरांची  बाजू मांडली. एकूणच नागरिकांची यासंदर्भातील भावना समजून घेण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत माथेरानकरांनी आपला संघर्षाच्या इरादा पोलिसांसमोर  स्पष्ट केल्यामुळे  हरित लवादाच्या निकाल नुसार कारवाई करायची ठरविल्यास माथेरान मध्ये प्रशासन विरुद्ध ग्रामस्थ संघर्ष मात्र अटळ आहे

आपली प्रतिक्रिया द्या