जागतिक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १३ खेळाडूंची निवड

36

सामना ऑनलाईन, पुणे

स्पेन येथे होणाऱया जागतिक बायथल आणि ट्रायथल स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघाची निवड करण्यात आली आहे. या १९ सदस्यीय संघात महाराष्ट्राच्या १३ खेळाडूंनी स्थान पटकाकले आहे. हिंदुस्थानी संघ सलग आठव्यांदा या स्पर्धेत सहभागी होणार आहे. जितेंद्र खासनीस यांची संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी निकड करण्यात आली असून ही स्पर्धा २० ते २४ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

या स्पर्धेतील खेळाडूंची निवड ऑगस्टमध्ये म्हाळुंगे-बालेवाडी येथे झालेल्या आठव्या  मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीनुसार करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंचे घोरपडी पेठेतील शार्क अॅक्लेटिक क्लब येथे राष्ट्रीय शिबीर १० ते १७ सप्टेंबरदरम्यान पार पडले. मॉडर्न पेंटॅथलॉनचे अध्यक्ष सुनील पूर्णपत्रे, सचिक नामदेव शिरगावकर, क्रीडा संचालक विनय मराठे यांनी हिंदुस्थानी संघाची घोषणा केली. गेल्या वर्षीचा ठाण्याचा सुवर्णपदक विजेता वेदांत गोखले आणि पुण्याचा रौप्यपदक विजेता अर्जुन आडकर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. मुग्धा वाहाळ, विधिका परमार, देवेश जंगम यांच्याकडूनही जागतिक स्पर्धेत चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

हिंदुस्थानी संघ – रेवती कामिनेनी (आंध्र प्रदेश), आस्था ठकार (गुजरात), निखिल मिसाळ (महाराष्ट्र), जॉन बोपुरी (आंध्र प्रदेश), अस्लेषकुमार अगस्थी (आंध्र प्रदेश), अहिल्या चव्हाण (महाराष्ट्र), दिशांत सैनी (उत्तर प्रदेश), देकेश जंगम, शिवतेज पवार, सायली गंजळे, प्रतीक बांग, मुग्धा वाहाळ, वेदांत गोखले, अर्जुन आडकर (सर्व महाराष्ट्र), प्रजित असोकन (तामीळनाडू), विधिका परमार, मैथिली चिटणीस, प्रवीण देशपांडे, हिरेन बुझरूक (सर्व महाराष्ट्र)

आपली प्रतिक्रिया द्या