अंडर-१९ : बक्षिसाच्या रकमेवरून नेटकऱ्यांची बीसीसीआयवर फटकेबाजी

13

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियावर ८ विकेटने दणदणीत विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयने खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला बक्षिस जाहीर केले. विश्वचषकाच्या संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी ३० लाख, प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख असे बक्षिसाचे स्वरूप आहे. मात्र बीसीसीआयने जाहीर केलेली रक्कम पाहून नेटकऱ्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

बीसीसीआयने बक्षिसाची रक्कम जाहीर केल्यानंतर नेटकऱ्यांनी ही रक्कम खूप कमी असल्याचे म्हटले आहे. एका युझरने बीसीसीआय एवढी गरीब कधीपासून झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर एकाने लिहिले आहे की, अंडर-१९मध्ये खेळलेल्या खेळाडूंपेक्षा वाईट खेळणाऱ्या खेळाडूंना आयपीएलमध्ये कोटींनी पैसे मिळत आहे. तर एकाने प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक-एक कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे तसेच राहुल द्रविडला त्याच्या कामाचा योग्य मोबदला दिला नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

विश्वचषकाच्या अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानपुढे २१७ धावांचे आव्हान ठेवले होते. सलामीवीर मनजोय कालराच्या नाबाद १०१ धावांचा खेळीमुळे हिंदुस्थानने या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. मनजोतला सामनाविराचा तर शुभम गिलला मालिकाविराचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शुभमने संपूर्ण मालिकेत ३७२ धावांचा लयलूट केली.

आपली प्रतिक्रिया द्या