… म्हणून न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ‘त्याला’ चक्क उचलून मैदानाबाहेर नेले

1976

न्यूझीलंडचा क्रिकेट संघ जगभरात आपल्या खेळभावनेसाठी ओळखलो जाते. वरिष्ठ संघाने अनेकदा मैदानावर अशा कृतींनी चाहत्यांचे मन जिंकले आहे. वरिष्ठ संघासह ज्यूनिअर संघानेही असे काही केले की नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या अंडर-19 क्रिकेट वर्ल्डकप सुरू आहे. बुधवारी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजमध्ये सामना रंगला. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय गेतला. वेस्ट इंडीजचा किर्क मॅकेंजी याने सर्वाधिक 99 धावांची खेळी केली. पाय मुरगळल्यामुळे तो एकदा रिटायर हर्ड झाला आणि पुन्हा मैदानात उतरला. वेस्ट इंडीजच्या डावात सर्वात शेवटी किर्क बाद झाला. परंतु बाद झाला त्या क्षणी त्याची स्थिती एवढी खराब होती की तो व्यवस्थित उभाही राहू शकत नव्हता. त्यामुळे किवींच्या दोन खेळाडूंनी चक्क त्याला उचलून मैदानाबाहेर नेले.

विंडीजच्या डावात 43 व्या षटकादरम्यान किर्कचा पाय मुरगळल्याने तो रिटायर हर्ट झाला. त्यावेळी तो 103 चेंडूत 99 धावा करून नाबाद होता. वेस्ट इंडीजचे नऊ खेळाडू बाद झाल्यानंतर 48 व्या षटकात तो पुन्हा मैदानात उतरला. परंतु न्यूझीलंडचा गोलंदाज क्रिस्टियन क्लार्कच्या गोलंदाजीवर तो क्लिन बोल्ड झाला. त्यावेळी त्याचा पाय पुन्हा मुरगळला आणि त्याने मैदानात मांड ठोकली. वेदनेने कळवळणाऱ्या किर्कला पाहून न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी त्याला आधार दिला, मात्र तो चालूही शकत नसल्याचे पाहून खेळाडूंनी त्याला उचलून घेतले व मैदानाबाहेर नेले. आयसीसीने याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

आयसीसीने ट्वीट केलेल्या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कौतुकाच्या कमेंट केल्या आहेत. अनेकांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी दाखवलेल्या खेळ भावनेचे मन भरून कौतुक केले आहे.

tweet-reply-icc

आपली प्रतिक्रिया द्या