‘धोलावीरा’… देशातील आणखी एक ठिकाण युनेस्कोच्या यादीत

dholavira

आपल्या देशातील प्राचीन संस्कृती, सभ्यतेची आठवण करून देणारी अनेक ठिकाणं आहेत. त्यातील अनेक ठिकाणांना युनेस्कोने मान्यता दिली आहे. देशातील आणखी एक ठिकाण युनेस्कोच्या यादीत दाखल झाले आहे. ‘धोलावीरा’ (Dholavira) असे या ठिकाणाचे नाव असून हे गुजरातमध्ये आढळते.

देशातील गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील भचाउ तालुक्यातील एक ठिकाण आहे. हे एक पुरातत्व स्थळ आहे. या ठिकाणाचं नाव इथून एक किलोमीटर अंतरावर दूर असलेल्या दक्षिणेकडे असलेल्या गावावरून देण्यात आले आहे. जे राधनपूरहून 165 किमी दूर आहे. धोलावीरा मध्ये सिंधू खोऱ्यातील प्राचीन अवशेष आणि वास्तू आढतात. त्याकाळच्या सभ्यतेशी साम्य असणाऱ्या नगरांपैकी हे नगर असल्याचे सांगितले जाते.

हे नगर 47 हेक्टर (120 एकर) स्क्वेअरफूट क्षेत्रफळावर पसरलेले आहे. या नगराच्या उत्तरेला मनसर झरे आणि दक्षिणेकडे मनहर झरे आहेत, जे वर्षातील काही महिने प्रवाही असतात. इथे इसवीसन पूर्व 2650 पासून इथे नागरि वस्ती होती तर इसवीसन पूर्व 2100 नंतर नागरिकांच्या संख्येत घट झाली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे. काही काळ असाही गेला ज्या काळात या नगरात कुणीही वास्तव्य केले नाही. इसवीसन पूर्व 1450 पासून पुन्हा इथे लोक राहू लागले. नव्या अभ्यासातून असे संकेत मिळेत आहे की इथे इसवीसन पूर्व 3500 पासून लोक इथे वास्तव्याला होते. इसवीसन पूर्व 1800 पर्यंत लोक इथे रहात असवावेत. धोलावीरा पाच हजार वर्षांपूर्वीपासून जगातील एक गजबजलेले शहर होतं.

हे प्राचीन काळातील एक व्यापारी केंद्र होते. इथे श्रीमंतांचं शहर मानलं जायचं, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. सिंधू नदी याच शहराच्या भागातून समुद्रात मिसळून जाते.

आपली प्रतिक्रिया द्या