कश्मिरी तरुणांच्या हातात पेनऐवजी बंदूक येणे दुर्दैवी – मेहबुबा मुफ्ती

11

सामना ऑनलाईन, श्रीनगर

कश्मीमधील तरुणांच्या हातात पेन असायला हवे; मात्र दुर्दैवाने त्यांच्या खांद्यावर बंदूक येत आहे हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे, अशी खंत जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केली. जम्मू-कश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात त्या बोलत होत्या.

पाकव्याप्त कश्मीर दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान बनला आहे. कश्मीरमधील तरुणांची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे. कश्मीरमधील विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले तर त्यांचे विचार प्रगल्भ होतील. ते दहशतवादाकडे वळणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कश्मीरमधील सध्याच्या समस्येवर मुफ्ती यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. कश्मीरमधील तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादाकडे ओढण्यात येत आहे हे अस्वस्थ करणारे आहे, असेही मुफ्ती म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या