रेल्वे सुरक्षेसाठी घोषणा हाय फाय, मुंबईसाठी विशेष काय नाय!

108

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये हिंदुस्थानातील रेल्वेसाठी १ लाख ४८ हजार कोटी रुपयांच्या तरतूदची घोषणा केली आहे. रेल्वेशी निगडीत सर्वात मोठी घोषणा करत अर्थमंत्र्यांनी हिंदुस्थानातील सर्व रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करणार असून रूळ आणि गेज बदण्याची कामेही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सरकारचे पहिले लक्ष हे रेल्वेची सुरक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.

जेटली म्हणाले की, रेल्वेच्या सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत अर्थसंकल्पातील सर्वात मोठा भाग हा रूळ आणि गेज बदलण्याच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. ५००० किलोमीटरपर्यंतचे रेल्वे रूळांच्या गेज बदलण्याचे काम सुरू आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, छोट्या मार्गांना मोठ्या मार्गात बदलण्याचे काम सुरू आहे. तसेच यावर्षी ७०० नवीन रेल्व इंजिन आणि ५१६० नवीन रेल्वेचे कोच बनवण्यात येणार आहेत. रेल्वे सुरक्षेकडे लक्ष वेधत अर्थमंत्र्यांनी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्याच्या योजनेची घोषणा करत या वर्षी ६०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचे काम करण्यात येणार असून प्रत्येक स्थानकांवर सरकते जिने लावण्याच्या योजनेची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २५ हजारपेक्षा जास्त प्रवासी येतात अशा रेल्वे स्थानकांवर तिथे एस्केलेटर लावणार. सर्व स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही आणि वायफाय लावणार.

३६०० किलोमीटरपर्यंतच्या रेल्वे मार्गांचे नुतनीकरण करण्यात आले असून ४०००० कोटी रूपये एलिवेटेड कॉरिडोरच्या निर्मितीसाठी खर्च करण्यात येणार आहेत. मुंबई रेल्वेला शहराची जीवनरेखा सांगत मुंबई लोकलचे क्षेत्र ९० किलोमीटरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. तसेच मोदी सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना असलेली बुलेट ट्रेनच्या संदर्भात घोषणा करत अर्थमंत्र्यांनी संगितले की, मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड बुलेट ट्रेनचा मार्ग बनवण्याचे काम सुरू करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येईल, असेही जेटली म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या