रिक्षा-टॅक्सीचे भाडे वाढवा, रिक्षाचालक संघटनेची मागणी

टॅक्सी संघटनेचे नेते ए. एल. क्वाड्रोस यांनी शुक्रवारी काळ्या-पिवळ्या टॅक्सीला भाडेवाढ करण्याची मागणी केली.  सी.एन.जी. दरात 3.44 रुपयांची वाढ झाल्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे. ”रिक्षाचालकाला दोन रुपये दरवाढ मिळून 18 रुपयांवरुन 20 रुपयांपर्यंत दरवाढ करावी.” असे मुंबई रिक्षाचालक संघटनेचे सरचिटनीस थँपी कुरियन म्हणाले.

क्वाड्रोस यांच्या म्हण्याप्रमाणे ,”वाहनचालकांना 3 वर्षापासून भाववाढ मिळाली नसल्याने आम्ही राज्यपरिवहन विभागाकडे भाडेवाढीची मागणी करणार आहोत.” असे ते म्हणाले. हकीम समितीने सांगितले की, ” टॅक्सीच्या भाड्यात 5 रुपये दरवाढ करण्यात येईल व किमान भाडे 27 रुपये इतके  करण्यात येईल. परंतु आम्ही प्रवाशांचे हित लक्षात घेता वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी फक्त 25 रुपये भाडेवाढीची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या