LIVE- चिदंबरम यांना जामीन नाकारला, 26 ऑगस्टपर्यंत कोठडीत रवानगी

1417

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अखेर सीबीआयने अटक केली आहे. चिदंबरम यांनी एक रात्री सीबीआय कोठडीत घालवल्यानंतर आज त्यांना सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. चिदंबरम यांनी जामीनासाठी अर्ज केला, मात्र न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. तसेच त्यांची पाच दिवसांसाठी सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे.

 • कुटुंबीय आणि वकील चिदंबरम यांना रोज अर्धा तास भेटू शकणार

 • 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी
 • पाच दिवसांच्या सीबीआय कोठडीत रवानगी
 • सीबीआय कोर्टाने चिदंबरम यांना जामीन नाकारला

 • चिदंबरम तपासात सहकार्य करत नाही-सॉलिसिटर जनरल तुषार मेहता

 • चिदंबरम यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत-तुषार मेहता
 • इंद्राणीवर तिच्या मुलीचा म्हणजेच शीना बोराचा खून केल्याचा आरोप आहे.
 • इंद्राणी मुखर्जी आणि तिचा नवरा पीटर मुखर्जी हे INX मीडियामधले भागीदार होते
 • इंद्राणी मुखर्जी आणि चिदंबरम यांना आमने सामने आणण्यात येणार
 • मेहता यांनी चिदंबरम यांच्यावर आरोप काय आहे ते न्यायालयाला सांगितले
 • सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सीबीआयतर्फे युक्तिवाद सादर करत आहेत
 • न्यायालय खच्चून भरले असून गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण आहे
 • न्यायाधीशांनी खटल्याला सुरुवात केली
 • काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल हे चिदंबरम यांचे वकील आहे
 • चिदंबरम यांची बाजू मांडण्यासाठी 4 तगडे वकील न्यायालयात
 • सीबीआय चिदंबरम यांची 5 दिवसांची कोठडी मिळावी यासाठी मागणी करणार
 • चिदंबरम यांच्यासोबत त्यांची पत्नी, सूनही न्यायालयात पोहोचले
 • चिदंबरम यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले
 • दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात चिदंबरम यांना हजर केले
आपली प्रतिक्रिया द्या