गृहमंत्री अमित शहांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद

555

हिंदूंचा महत्त्वाचा सण ‘मकरसंक्रांत’ उद्या 15 जानेवारीला देशभरात साजरा केला जाणार आहे. याच निमित्ताने देशाचे गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा गुजरातमध्ये दाखल झाले. अमित शहा यांनी अहमदाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये पतंग उडवण्याचा आनंद लुटला.

मकरसंक्रांतनिमित्त अहमदाबाद येथे उत्तरायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते सहभागी झाले. शहांच्या स्वागतासाठी यावेळी मोठी गर्दी झाली होती. उत्तरायण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन शहांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला.

आपली प्रतिक्रिया द्या