मकरसंक्रांतीनिमित्त गृहमंत्री अमित शहांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद

देशभरात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. कोरोनाच्या सावटातही नागरिकांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील स्वत:ला रोखू शकले नाहीत.

अमित शहा हे मकर संक्रांतीनिमित्ताने गुजरातमध्ये आले होते. याच वेळी अमित शहा यांना देखील पंतग उडविण्याचा आपला मोह रोखता आला नाही आणि त्यांनी देखील मनसोक्तपणे पतंग उडवले.

मकरसंक्रातीच्या सणाला गुजरातसह देशातील अनेक राज्यात पतंगबाजी केली जाते. काही ठिकाणी तर याच्या विशेष स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. मात्र यंदा अनेक स्पर्धांवर कोरोनाचे सावट दिसून आले.

कोरोनाच्या संकटातही लोकांनी तिळगुळ खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. मंदिरांमध्ये स्त्रीयांची ओवसण्यासाठी गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्स राखत आणि कोरोनाचे नियम पाळत हा सण साजरा केला गेला. तसेच घरोघरी हळदी-कुंकवाचे कार्यक्रमही रंगले.

आपली प्रतिक्रिया द्या