गृह खात्याचीच कबुली; देशात ‘टुकडे- टुकडे गँग’ नाही

699

देशात ‘टुकडे-टुकडे गँग’ नाही अशी कबुली खुद्द केंद्रीय गृह खात्यानेच माहिती अधिकारात दिली आहे. देशातील अशांततेला ‘टुकडे-टुकडे गँग’ जबाबदार आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्यावरून सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली होती.

26 डिसेंबर 2019 रोजी गोखले यांनी हा अर्ज केला होता. ‘टुकडे-टुकडे गँग’ अस्तित्वात आल्याचा दिनांक, या गँगच्या सदस्यांची नावे तसेच या गँगवर बेकायदा कृत्ये केल्याबद्दल प्रतिबंधक कायद्याखाली बंदी घातली गेली असेल तर त्याची माहिती द्यावी, अशी मागणी गोखले यांनी अर्जात केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या