बलात्काराची प्रकरणे दोन महिन्यात निकाली काढण्यासाठी पुढाकार घेणार – रविशंकर प्रसाद

588

देशातील बलात्काराच्या घटना आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची चौकशी करून त्या तातडीने निकाली काढण्याची गरज आहे,असे मत केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. अशी प्रकरणे दोन महिन्यात निकाली काढण्याबाबत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून शिफारस करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देशातील अनेक भागात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने देशभर संतापाचे वातावरण आहे. महिला अत्याचारांच्या प्रकरणांचा ताताडीने निपटारा करण्यासाठी व्यवस्था असण्याची गरज असल्याचे प्रसाद म्हणाले. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांची दोन महिन्यात चौकशी पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशात जलदगती न्यायालये स्थापन करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर 1023 जलदगती न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. 1023 जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यापैकी 400 जलदगती न्यायालये स्थापन करण्याबाबत सहमती झाली आहे. तसेच 160 जलदगती न्यायालये सुरू झाले असून देशात 704 जलदगती न्यायालये सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या