कश्मीरी नेते नजरकैदेत नाहीत, ते सरकारी पाहुणे आहेत – जितेंद्र सिंह

382

जम्मू कश्मीरमधील परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. तसेच कश्मीर खोऱ्यात आता शांतता प्रस्थापित होत आहे. त्यामुळे जम्मू कश्मीरमधून कर्फ्यू हटवण्यात आला आहे. कश्मीर खोऱ्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कश्मीरमधील अनेक नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. मात्र, ते नजरकैदेत नसून ते पाहुणे (हाऊस गेस्ट) आहेत, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

स्थानबद्ध असलेल्या या नेत्यांना व्हीआयपी बंगल्यात ठेवण्यात आले असून त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत. त्यांना हॉलीवूड सिनेमांच्या सीडी देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना जिमची सुविधाही उपल्ब्ध करून देण्यात आली आहे, असेही सिंह यांनी सांगितले. जम्मू कश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर या नेत्यांची मुक्तता करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. या नेत्यांना 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ स्थानबद्धतेत ठेवण्यात येणार नाही, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या