केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, सुदैवाने बचावले

ravi-shankar-prasad-pc
माजी संसदीय कामकाज मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पाटना साहिबमधून शत्रुघ्न सिन्हांचा पराभव केला आहे. रवीशंकर प्रसाद हे देखील मंत्रिपदी पुन्हा विराजमान होणार

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले असताना पाटणा विमानतळावर त्यांच्या हेलिकॉप्टरची तारेला टक्कर झाली. अपघातात हेलिकॉप्टरच्या पंख्याचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना होण्यापूर्वी रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि जल संधारण मंत्री संजय झा हेलिकॉप्टरमधून उतरल्याने मोठा अपघात टळला. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजपने अनेक दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरवले आहेत. केंद्रित मंत्री रविशंकर प्रसाद देखील प्रचारासाठी बिहारमध्ये आहेत. सायंकाळी प्रचारावरून येत असताना पाटणा विमानतळावर लँडिंग दरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिकॉप्टरचे पंखे ओव्हरहेड वायरला घासले गेले आणि त्याचे तुकडे झाले.

दरम्यान, ही दुर्घटना घडण्यापूर्वी केंद्रीय मंत्री हेलिकॉप्टरमधून उतरले होते आणि ते सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या